
आपल्या भूमिकेबद्दल माधव अभ्यंकर म्हणतात, “देव आयुष्य देतो, तर किरवंत मोक्ष देतो, अशा धार्मिक विचारसरणीची ही व्यक्तिरेखा असून त्याचा भक्ती, श्रद्धा यांवर जास्त विश्वास आहे. प्रत्येक धार्मिक क्रियेमागे काही कारण असते, हे पटवून देणारी ही व्यक्तिरेखा आहे. यापूर्वी मी अनेक भूमिका साकारल्या परंतु अशा प्रकारची भूमिका मी प्रथमच साकारत आहे. त्यातही अशोक सराफ यांसारखे मातब्बर कलाकार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे ही माझ्यासाठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. तरुण दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमाल होता. हल्लीच्या तरुणाईचा दृष्टिकोन, त्यांची कामाची पद्धत हेसुद्धा शिकण्यासारखे आहे.”







