
राजकारणात छोट्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सर्वोच्च नेत्यांबद्दल कौतुकाचे उद्गार काढणं हे नवीन नाही. बहुतेक राजकीय कार्यक्रमात हे चित्र दिसतं. राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एका कार्यक्रमात काढलेले कौतुकोद्गार सध्या जोरदार चर्चेत आहे. मी अमृता फडणवीस यांना यापुढं ‘मॅम’ नव्हे तर ‘माँ अमृता’ संबोधणार, असं त्यांनी म्हटलं आहे.





