
Mukesh Ambani India Richest Just Got Richer : मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानीना मोठा जॅकपॉट लागला आहे. अंबानी यांनी 24 तासात कमावले 57500 कोटी कमावले आहेत. यामुळे अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांना मागे टाकले आहे. अंबानी 24 तासांत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती बनले आहेत.
48 तासात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. चीनपासून अमेरिकेपर्यंत सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. 6 आणि 7 मार्च या दोन दिवसांत मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत 6.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 57,500 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 88 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. शुक्रवारीही त्यांच्या एकूण संपत्तीत सुमारे 3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली.
मुकेश अंबानी जगातील 17 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार यांच्या संपत्तीत शुक्रवारी 2.92 अब्ज डॉलर्स म्हणजेच 25,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 88.1 अब्ज डॉलर्स झाली आहे.मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत चालू वर्षात 2.49 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ होत आहे. मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत 6.60 अब्ज डॉलर्स म्हणजेच 57,500 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.. गुरुवारी मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत 3.7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सने मोठी उसळी घेतल्याने मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाली. मुकेश अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 6.24 टक्क्यांची वाढ झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार 5 मार्च रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1,175.75 रुपयांवर होते. 7 मार्च रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 73.35 रुपयांची वाढ झाली आहे.
24 तासांच्या कमाईत अमेरिकन गुंतवणूकदार लॅरी एलिसन अंबानींपेक्षा पुढे आहेत. एलिसन हे सॉफ्टवेअर कंपनी ओरेकलचे अध्यक्ष आणि सीटीओ देखील आहेत. एलिसनने 24 तासांत 3.29 अब्ज डॉलर्सची कमाई केली. एलिसननंतर, कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानी यांचा क्रमांक लागतो. अंबानीनंतर, तिसरे स्थान डेल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि अध्यक्ष मायकल डेल यांचे आहे. 24 तासांत डेलची एकूण संपत्ती 2.53 अब्ज डॉलर्सने वाढली.