Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रइंदापूरमध्ये युवकावर गोळीबार – कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

इंदापूरमध्ये युवकावर गोळीबार – कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

इंदापूर :-बारामती येथील एका महाविद्यालयाच्या आवारात एका महाविद्यालयीन युवकाच्या खुनाचा प्रकार ताजा असतानाच, इंदापूर येथेही एका युवकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा रहिवासी राहुल चव्हाण (वय २२) हा युवक इंदापूर महाविद्यालयाच्या परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर तीन ते चार वेळा फायर केले. या गोळीबारात राहुल गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने इंदापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावर तातडीची कारवाई:

घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात नाकाबंदी करून संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत.

इंदापूरमध्ये खळबळ:

या घटनेनंतर इंदापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आज सकाळीच बारामतीमध्ये एका युवकाचा खून झाल्यामुळे या घटनेने आणखी खळबळ उडवली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला नाही का, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

गुन्हेगारी वाढ:

बारामती व इंदापूर परिसरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणात कडक कारवाई करून आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments