
पुण्यात हीट अँड रनची घटना ताजी असतांना मुंबईत देखील आज सकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरळी कोळीवाडा येथे राहणारे नाकवा हे दाम्पत्य सकाळी मासे खरेदीसाठी मुख्य बाजारात दुचाकीवरुन गेले होते. दोघांनीही ससून डॉकला जाऊन तेथून मासे खरेदी करून परत येत असतांना एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी त्यांच्याकडे मोठे सामान होते. दोघेही थेट दुचाकीसह भरधाव गाडीच्या बोनेटवर जाऊन पडले. यावेळी नवऱ्याने स्वत:ला बाजूला केले. मात्र, महिलेला भरधाव गाडीची जोरदार धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की यात महिला ही गंभीर जखमी झाली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.







