
जागतिक रंगभूमी दिन हा आज २७ मार्च रोजी साजरा केला जातो. रंगकर्मी, या क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व रंगभूमीशी नातं असलेले सर्वजण या दिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान, नाटावर भरभरुन प्रेम करणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने देखील खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.








