
मध्य प्रदेशसह देशातील चार राज्याच्या विधानसभा निवडणुका यावर्षी होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी आणि आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मोठी घोषणा केली आहे. त्याअंतर्गत मध्य प्रदेशातील महिलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केले होते की, सध्या पोलीस खात्यात फक्त ३० टक्के मुलींची भरती होते. आता ती ३५ टक्क्यांपर्यंत वाढवत आहे. उर्वरित सर्व नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के भरती फक्त मुलींसाठीच असतील.







