सहकाराला नवे बळ देणार! फलटणमधील प्रशिक्षण सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवड पूर्ण – अॅड. शितल अहिवळे अध्यक्ष, रविंद्र बेडकिहाळ उपाध्यक्ष

0
12
सहकाराला नवे बळ देणार! फलटणमधील प्रशिक्षण सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवड पूर्ण – अॅड. शितल अहिवळे अध्यक्ष, रविंद्र बेडकिहाळ उपाध्यक्ष

फलटण (साहस Times ) – सहकाराला चालना देण्यासाठी प्रशिक्षित नेतृत्व आवश्यक असून, सर्व सहकारी संस्थांनी केवळ नावापुरते न राहता उद्दिष्टपूर्तीसाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. असे स्पष्ट मत सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी व्यक्त केले.

श्री सद्गुरु हरिभाऊ महाराज सरकार प्रशिक्षण सहकारी संस्था मर्यादित, फलटण या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नव्याने स्थापन झालेल्या संचालक मंडळाची प्रथम बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदी अॅड. शितल अहिवळे यांची तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांची एकमताने निवड करण्यात आली.

या वेळी बोलताना दिलीपसिंह भोसले यांनी प्रशिक्षणाची गरज अधोरेखित करताना सांगितले की, “सहकार क्षेत्रातील सर्व घटक प्रशिक्षित झाले तरच सहकार क्षेत्र बळकट होईल.”

नवीन नेतृत्वाकडून अपेक्षा वाढलेल्या असताना, अध्यक्ष अॅड. शितल अहिवळे व उपाध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ सर यांनी या आर्थिक वर्षात सहा ते नऊ प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या वेळी अॅड. नरसिंह निकम, संदीप जगताप यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते.