
Who Is Shura Khan: बॉलिवूड अभिनेता, निर्माता अरबाज खान याच्यासोबत लग्न बंधनात अडकलेली शूरा खान आता चांगलीच चर्चेत आली आहे. अरबाज खान याने वयाच्या ५६व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. काही दिवसांपूर्वी अरबाज खान याच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करणाऱ्या अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी यांनी नुकताच त्यांचा ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले होते. याच्या काहीच दिवसानंतर अरबाज खान अचानक लग्न बंधनात अडकला आहे. गेल्या आठवड्यापासून अरबाज खान याच्या लग्नाची चर्चा सुरू होती. मात्र, आता अभिनेत्याने थेट लग्नाचे फोटो शेअर करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘खान’ परिवाराची ही नवी सून शूरा खान आहे तरी कोण?, असा प्रश्न देखील आता सगळ्यांना पडला आहे.






