फलटण – शहरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा व बेवारस जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचे टोळके व बेवारस जनावरांचे कळप नागरिकांना व वाहनचालकांना अडथळा ठरत असून लहान मुलांवरही हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा जीव गेल्यावरच का नगर पालिका जागी होणार, असा सवाल माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी उपस्थित केला आहे.
जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, नगरपालिकेने आठ दिवसांच्या आत या प्रश्नावर ठोस उपाययोजना करावी, अन्यथा भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीतर्फे नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्यात येईल.