
व्यू वन्स मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी हा पर्याय निवडावा लागेल. एकदा पाहिल्यानंतर, हा मेसेज प्राप्तकर्त्याद्वारे पुन्हा पाहू शकला जाणार नाही. विशेष म्हणजे हा मेसेज रिसिव्हरच्या फोनमध्येही सेव्ह होणार नाही. तुम्हाला तुमच्या फोनवर पाहण्यायोग्य व्हॉइस मेसेज मिळाल्यास, तुम्ही तो १४ दिवसांच्या आत ऐकला पाहिजे. अन्यथा, हा मेसेज १४ दिवसांनंतर आपोआप गायब अथवा डिलिट होईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बॅकअप दरम्यान न उघडलेले व्हॉइस मेसेज पन्हा मिळवले जाऊ शकतात.







