What is Cypher : पाकिस्तानात इम्रान खानला १० वर्ष शिक्षेसाठी कारणीभूत ‘सायफर प्रकरण’ आहे तरी काय?

0
17
What is Cypher : पाकिस्तानात इम्रान खानला १० वर्ष शिक्षेसाठी कारणीभूत ‘सायफर प्रकरण’ आहे तरी काय?


पाकिस्तानात सध्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाकिस्तानात सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मोठमोठ्या सभांना संबोधित करताना दिसत आहेत. यात प्रामुख्याने पाकिस्तान मुस्लिम लिग नवाझ गट (Pakistan Muslim League (N) चे नेते, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, शरिफ यांचे बंधु आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरिफ, शरिफ यांची कन्या मरियम नवाज, पाकिस्तान पीपल्स पार्टी (Pakistan People’s Party) चे अध्यक्ष, माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या ठिकठिकाणी लाखोंच्या सभा होत आहे. यंदाच्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांमधून एक चेहरा गायब दिसतोय, तो म्हणजे पाकिस्तान तहरिक इन्साफ ( Pakistan Tehreek-e-Insaf) या पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे होय. एप्रिल २०२२ मध्ये पाकिस्तानात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर इम्रान खान यांना पंतप्रधानपद गमवावं लागलं होतं. त्यानंतर शाहबाज शरिफ यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने इम्रान खानवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून अटक केली होती. त्यात इम्रानला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टाने इम्रान खानला निवडणूक लढण्यास अपात्र ठरवलं आहे. आता सध्या सायफर प्रकरणाची खूप चर्चा होतय. या प्रकरणात इम्रान खान आणि त्यांच्या काळात परराष्ट्र मंत्री असलेलेलश शाह मेहमूद कुरेशी यांना १० वर्ष कारावास ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तानात येत्या ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होतय. मतदानाच्या नेमक्या दोन आठवडे आधी कोर्टाने इम्रान खान यांना सायफर प्रकरणात १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. इम्रान खान पंतप्रधानपदी असताना हे सायफर प्रकरण घडलं होतं. नेमकं हे सायफर प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊ या.



Source link