
महाराष्ट्रातील सर्वात कमी तापमान हे जळगावात (१३.२ अंश सेल्सिअस) नोंदवण्यात आलं आहे. त्यानंतर महाबळेश्वरचं तापमान १६.०८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये सरासरी तापमानात मोठी घट होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं आता पुढील महिन्यापासून नागरिकांना शेकोट्या पेटवत उबदार कपड्यांचा वापर करावा लागणार आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळामुळं महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातच्या किनारी भागांमध्ये पुढील एक ते दोन दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाजही आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.






