आम्ही अकलूज ला कोणत्याही राजकीय कारणांसाठी गेलो नव्हतो; तर विजयदादांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो : श्रीमंत रामराजे

0
19
आम्ही अकलूज ला कोणत्याही राजकीय कारणांसाठी गेलो नव्हतो; तर विजयदादांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो : श्रीमंत रामराजे

फलटणःमाढा लोकसभा मतदारसंघातील नाईक निंबाळकरांचा अकलूज दौरा अतिशय चर्चेचा ठरला आहे. कारण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सह श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघूनाथराजे नाईक  निंबाळकर आमदार दिपकराव चव्हाण यांच्या सह ताफा घेऊन अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील यांच्या बरोबर खलबते झाल्याची जोरदार चर्चा माढा लोकसभा मतदारसंघात झाली त्याचबरोबर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आमदार जयकुमार गोरे यांच्या सह माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या बंगल्यावर गेले. आमदार राम सातपुते यांनी कमळ हा उमेदवार समजून काम करणार असल्याचे सांगत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपच्या प्रोटोकॉल प्रमाणे आमदार राम सातपुते काम करणार आहेत. मात्र भाजपमध्ये असलेल्या मोहीते पाटील यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेली उमेदवारी पचनी न पडल्याने मोठी तारांबळ उडाली आहे. मागच्या निवडणुकीत माळशिरस मधुन लाखाच लीड देणार या घेतलेल्या वचना प्रमाणे मोहिते पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत एक लाखाहून जास्त मताधिक्य देण्यात

बाजी मारली आहे. पण २०२४ च्या निवडणुकीच तिकीट मोहिते पाटील घराण्यात मिळवण्यात अपयश आल्याने मोहिते पाटील नाराज आहेत. मोहीते पाटील समर्थक काही झाले तरी निवडणूक लढावायची वाटलं तर पवारांची तुतारी फुंका असा सुरू देत आहेत. असे अनेक मोठे नाट्यमय घडामोडी घडत आहेत परंतु मोहीते पाटील तुतारी फुंकतील किंवा बंडखोरी करतील असं वाटतं नाही कारण की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला प्रचंड आक्रमक विरोध पहायला मिळत होता परंतु अकलूज वरून फलटणला आल्या आल्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अतिशय सावधपणे प्रसार माध्यमाशी सांगितले आहे, त्यामध्ये ते म्हणतात की, हे बघा आम्ही अकलूज ला कोणत्याही राजकीय कारणांसाठी गेलो नव्हतो तर विजयदादांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. मी ज्या पार्टीत आहे त्यांच्याशी विचारपूस करूनच भूमिका ठरवले. नेहमीच आक्रमक भूमिकेत पहायला मिळालेल्या रामराजेंनी आता दिलेल्या सावध भूमिकेवरून आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांनी फडणवीसांचा पाठवलेला सांगावा शिवरत्न बंगल्यावर दिला आहे त्यामुळे तुर्तास असे वाटत आहे की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना व मोहीते पाटलांना महायुतीचा धर्म पाळावा लागतोय का?