
भावोजी दारू पिऊन बहिणीला सतत भांडायचा, मारहणा करायचा म्हणून त्यांचं व्यसन कायमचं सुटावं म्हणून मेव्हणा भावोजीला घेऊन दारू सोडवण्यासाठी जात होता. रस्त्याने जात असताना त्यांच्यात वाद झाला व भाऊजीने मेव्हण्यावर हल्ला केला. स्वत:चा बचाव करताना मेव्हण्याने जॅक आणि कोयत्याने वार केल्याने बहिणीच्या पतीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील अकोला-नांदेड महामार्गावरील झोडगा गावाजवळील एका बंद ढाब्यानजिक घडली आहे.






