Viral Video: महेश बाबूच्या लेकीचा लुंगी डान्स सोशल मीडियावर व्हायरल! तुम्ही व्हिडीओ पाहिलात का?

0
16
Viral Video: महेश बाबूच्या लेकीचा लुंगी डान्स सोशल मीडियावर व्हायरल! तुम्ही व्हिडीओ पाहिलात का?


सितारा घट्टामेननी हिने हा व्हिडीओ शेअर करताना वडील अभिनेता महेश बाबू याला देखील टॅग केले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘हा व्हिडीओ फक्त तुमच्यासाठी आहे’. सिताराचा हा डान्स व्हिडीओ पाहून तिची आई नम्रता शिरोडकर हिनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नम्रता शिरोडकर हिने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले की, ‘तू आमचा अगदी बेस्ट फटाका आहेस’. या व्हिडीओमध्ये सिताराने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. यासोबत तिने साऊथ स्टाईलमध्ये लाल रंगाची लुंगी बांधली आहे आणि त्यासोबत पांढरे स्नीकर्स घातले आहेत. या साऊथ राऊडी लूकमध्ये सितारा खूप छान दिसत आहे.



Source link