
Akshay Kumar-Tiger Shroff Viral Video: अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनौला पोहोचले होते. या कार्यक्रमात पोहोचण्यासाठी त्यांना बराच उशीर झाल्याने तिथे जमलेली गर्दी चांगलाच गोंधळ घालू लागली होती. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली. यावेळी चिडलेल्या लोकांनी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या दिशेने चपला फेकायला सुरुवात केली. संतापलेल्या चाहत्यांनी कलाकारांवर इतक्या चपला भिरकावल्या की, त्यातील जवळपास ८ चपला स्टेजवर पडल्या. या संतप्त जमावातील एकाने आपले हेल्मेट देखील दोघांच्या दिशेने फेकले. यावेळी अक्षय आणि टायगर दोघेही स्टेजवर स्टंट करत होते. अखेर परिस्थिती पाहून, अक्षय कुमारला हात जोडून लोकांना शांत बसण्यास सांगावे लागले. मात्र, तरीही गर्दी ऐकत नसल्याचे दिसताच सुरक्षा रक्षकांनी कलाकारांना वेळीच स्टेजच्या मागच्या बाजूला नेले. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.








