
Shah Rukh Khan Viral Video: बॉलिवूडच्या किंग खानने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२३मध्ये ‘पठान’ चित्रपटातून ४ वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या शाहरुख खानने आता आणखी एक कामगिरी केली आहे. स्वित्झर्लंडमधील ७७व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखला ‘करिअर अचिव्हमेंट’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. शाहरुखने यापूर्वी ‘पठान’, ‘जवान’ आणि ‘डंकी’सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुखने चित्रपट महोत्सवात आपल्या भाषणाने लोकांची मने जिंकली. त्याचवेळी या कार्यक्रमाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून आता जगभरातील लोक शाहरुखवर टीका करताना दिसत आहेत.







