
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक माणूस लाल रंगाचा साप पकडताना दिसत आहे. त्यावेळी हा साप आपला फना काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. हा साप दिसायला बिल्कूल किंग कोब्राप्रमाण आहे. मात्र लाल रंगाचा कोब्रा असणे, लोकांना संभ्रमात टाकणारे आहे. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर जवळपास १७ हजार लोकांनी लाइक्स केले आहे. हे खरे की बनावट यावर लोकांची चर्चा होत आहे. मात्र सर्वांना संशय येत असताना एका व्यक्तीने मानले की, इतक्या चमकदार रंगाचा कोब्रा खूपच कमी प्रमाणात दिसून येतो.