Viral Video: रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होताच कंगना रनौतने केला राम नामाचा जयघोष! व्हिडीओ होतोय व्हायरल

0
17
Viral Video: रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होताच कंगना रनौतने केला राम नामाचा जयघोष! व्हिडीओ होतोय व्हायरल

कंगना रनौत अयोध्येतून अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत आहे. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात देखील ती सामील झाली होती. यावेळी कंगना रनौत हिने एक सुंदर मोती रंगाची साडी नेसली होती. या साडीत कंगना रनौत खूप सुंदर दिसत होती. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कंगना रनौत दोन्ही हात वर करून राम नामाचा जयघोष करताना दिसली आहे. कंगना रनौत सध्या तिच्या या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Source link