Viral Video : मुक्या प्राण्याला क्रूर वागणूक! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण

0
21
Viral Video : मुक्या प्राण्याला क्रूर वागणूक! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण


तब्बल २० वेळा काठीने मारले तोंडावर फटके

व्हायरल झालेला हा व्हिडिओ तब्बल ४१ सेकंदाचा आहे, या व्हायरल व्हिडिओमध्ये लिफ्टमध्ये एक माणूस त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत असल्याचे दिसून येते. कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असून तो आरोपी केअरटेकरच्या हातात आहे. दरम्यान, अचानक कुत्र्याचा मालक कुत्र्याला विनाकारण तोंडावर फटके मारायला लागतो. सुमारे २० वेळा त्याने काठीने कुत्र्याच्या तोंडावर फटके मारले असल्याचे दिसत आहे, याशिवाय त्याने हाताने देखील कुत्र्याला मारहाण केली. हा संपूर्ण व्हिडिओ अस्वस्थ करणारा आहे. ‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, गुरुग्राम सेक्टर ५४ च्या ऑर्किड गार्डन सोसायटीची ही घटना घडली आहे. कुत्र्याच्या मालकाने केअर टेकरविरोधात पोलिस तक्रार केली नसून त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे.



Source link