Thursday, August 27, 2026
Homeसाताराफलटण तालुक्यातील पूर्व भागात चोरट्यांचा धुमाकूळ ; त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत...

फलटण तालुक्यातील पूर्व भागात चोरट्यांचा धुमाकूळ ; त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत .

फलटण : उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या जनतेची सध्या झोप उडली आहे ,तसेच लाखो रुपयांच्या चोरीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांची झोप उडली आहे . फलटण तालुक्यातील पूर्व भाग असलेल्या गोखळी , खटके वस्ती , मठाचीवाडी , चव्हाणवाडी गुणवरे ,साठेफटा , राजाळे गावाच्या हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे .

फलटण तालुक्यातील पूर्व भागात यापूर्वीही चोरीच्या अनेक घटना घडल्या  तक्रार देऊ नये काही तपास झाला नाही मग तक्रार देऊन काय उपयोग म्हणून चोरीची तक्रार न केलेली बरी असे अनेकजण  म्हणत आहेत

चोरीचा शोध लागत नाही यावरून पोलीस यंत्रणेवरील विश्वास उडत चालला आहे माझे आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे साहेब यांनी गाव पातळीवर महिला मोहल्ला कमिटी स्थापन करून चोरी मारामारी दंगल यासारख्या घटनांना बायबल घातला होता मोहल्ला कमिटीची रचना करताना समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्ती पत्रकार यांचा समावेश केला होता महिना 15 दिवसातून मॉलला मोहल्ला कमिटीचे मीटिंग घेऊन आढावा घेतला जात होता तात्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख मेरा बोरवणकर यांनी जिल्ह्याच्या सीमेवर रात्रीच्या बंदूकधारी पोलीस बंदोबस्त ठेवून रात्रीच्याळी चोरट्या मार्गाने होणारे अवैध वाहतूक अवैध धंदे जिल्हा बाहेरील येणारे चोरटे थोपवल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आले होते सुरेश खोपडे मीरा बोरवणकर यांच्यासारखे पुन्हा अधिकारी लाभलेले नाहीत सध्या पोलीस खात्या कुठे चोरी मारामारी भांडण तंटा सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत त्यामुळे चोरटे मोकाट सुटले आहेत शेतकऱ्यांना वीजपुरवठा करणारे डीपींची चोरी झाल्यामुळे आणि उन्हाळ्यात शेती पिकांचं नुकसान होत आहे , शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी वाढीस लागली आहे हे धोकेदायक ठरू शकते ,लोकसभा निवडणुकीचे कारण व कमी स्टाफ असल्यामुळे मर्यादा पडतात असे पोलीस खात्याकडून सांगण्यात येते ,परंतु लोकसभा निवडणूक आता या महिन्यात आहेत परंतु चोऱ्यांचे प्रकार अनेक महिन्यांपासून या भागात सुरू आहेत याचा बंदोबस्त यापूर्वी होणे गरजेचे होतं चोरी झाल्यावर उपाय शोधण्यापेक्षा चोरीच होणार नाही यासाठी उपाय शोधणे गरजेचे आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments