
काही जण या दोघांना क्युट कपल म्हणत आहेत. तर, काही जण मात्र दोघांना ट्रोल करताना दिसत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, ‘आईचे आयुष्य वेगळे, वडिलांचे आयुष्य वेगळे आणि मुलाचे आयुष्य वेगळे.’ एकाने गंमतीत म्हटलेय की, ‘बापाबरोबरच मुलालाही मैत्रीण मिळाली.’ आणखी एकाने लिहिले की, ‘नवीन चित्रपट येणार आहे… त्याची जाहिरात आतापासून चालू आहे.’ तर, एकाने ट्रोल करत म्हटले की, ‘आई डेट करतेय, वडिलांचं नुकतच लग्न झालंय, आता मुलगाही डेट करतोय, काय फॅमिली आहे.’ तर, काही लोक याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत.








