Viral Video: नवरा हॉटेल रुममध्ये सापडला मुलीसोबत, बायको आत आली;पुढे जे झालं…’

0
1
Viral Video: नवरा हॉटेल रुममध्ये सापडला मुलीसोबत, बायको आत आली;पुढे जे झालं…’


Extra Marital Affair: विवाहबाह्य संबंधांच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. हे प्रकार जेव्हा समोर येतात तेव्हा प्रामाणिक प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप मोठा धक्का असतो. आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात हे प्रकार वाढलेले दिसतात. असाच एक कथित व्हिडीओ समोर आलाय. 

सोशल मीडियात एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. जो पाहून सर्वांनाच धक्का बसलाय. व्हायरल होणाऱ्या या कथित व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडते. असं म्हटलं जातंय की, पत्नीला आधीच तिच्या पतीवर संशय होता. म्हणून तिने तिच्या मुलांसह आणि काही नातेवाईकांसह त्याला धडा शिकवण्याची योजना आखली. 

जेव्हा ते हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की नवरा त्याच्या मैत्रिणीसोबत खोलीत आनंद साजरा करतोय. त्या दोघांनी केक आणि वाईनदेखील सोबत घेतली होती. पार्टीसाठी ते पूर्णपणे तयार होते. बाहेरुन पत्नीने दार ठोठावले. यानतर पतीने दार उघडताच आणि त्याच्या समोर पत्नीला पाहिले आणि त्याचा चेहरा फिकट पडला.

पत्नीला राग अनावर, नवरा घाबरला

व्हिडिओमध्ये असे दिसून येतंय की, पत्नीला पाहून पती खूप घाबरलाय. आणि वारंवार तो तिची माफी मागतोय. तो तिच्या प्रेयसीला जाऊ देण्याची विनंती करतोय. पण पतीने केलेल्या विश्वासघातामुळे पत्नी खूप दुखावली आहे. ती रागाने तिच्या पतीला प्रश्न करतेय आणि म्हणते की, ‘अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही’. 

व्हिडिओमध्ये पत्नीचा राग आणि तुटलेला विश्वास स्पष्टपणे दिसतोय. तर पतीच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसतोय. ZEE न्यूज या व्हिडिओच्या सत्यतेला दुजोरा देत नाही किंवा त्याचे समर्थनही करत नाही. ही बातमी फक्त व्हायरल व्हिडिओच्या आधारे बनवण्यात आली आहे.

कोणी शेअर केलाय व्हिडिओ ?

व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच यूजर्सकडून वेगाने प्रतिक्रिया येऊ लागल्यायत. अनेकांनी पत्नीच्या धाडसी पावलाचे कौतुक केलंय तर काहींनी पतीच्या कृतीला अत्यंत लज्जास्पद म्हटलंय. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी. जेणेकरून भविष्यात कोणीही असे करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल, अशी कमेंटदेखील या व्हिडीओखाली आलीय.  हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एका एक्स हँडलवरून शेअर करण्यात आलाय.





Source link