Viral Video : जंगलाचा राजा सिंहाला भिडले दोन श्वान! असे केले घराचे रक्षण; गुजरात मधील व्हिडिओ झाला व्हायरल

0
19
Viral Video : जंगलाचा राजा सिंहाला  भिडले दोन श्वान! असे केले घराचे रक्षण; गुजरात मधील व्हिडिओ झाला व्हायरल


Viral news : सिंह हा जंगलाचा राजा आहे. सिंहाला पाहून अनेकांची  घाबरगुंडी उडते. सिंहाशी पंगा घेण्याचं किंवा त्याच्याशी लढण्याचं धाडस क्वचितच कुठला प्राणी करेल. आपल्या डरकाळीनेच शत्रूचे धैर्य मोडीत काढणाऱ्या या जंगलाच्या राजाला मात्र, दोन कुत्र्यांनी आव्हान दिल्याची एक घटना पुढे आली आहे. गोठ्याचे रक्षण करणारे दोन श्वान थेट दोन सिंहांशी जाऊन भिडले. मात्र, मध्ये गेट असल्याने सिंह आणि कुत्र्याला कोणतीही इजा झाली नाही. सिंह पुढे येऊनही श्वान मागे हटले नाहीत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुजरातमधील गीर नॅशनल पार्कपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. अनेक नेटकरी या कुत्र्यांच्या धडसाचे कौतुक करत आहेत.



Source link