
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सर्वात प्रथम वधू नवऱ्याला वरमाला घालते. त्यावेळी नवरदेव सरळ उभा राहून वरमालेचा स्वीकार करतो. मात्र, त्यानंतर नवरा मुलगा वधूला वरमाला घालण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी वधू पाठी सरकते. त्यानंतर दुसऱ्यांदाही तोच प्रकार घडतो. लग्नासाठी आतूर झालेला नवरदेव तिसऱ्यांदा वधूच्या गळ्यात वरमाला घालण्याचा प्रयत्न करतो. परंतु, यावेळीही वधू मागे सरकते. मात्र, यामुळे नवरदेवाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो सगळ्यांसर वधूला ढकलून देतो आणि वरमाला तिथेच टाकून निघून जातो. यावेळी घडलेल्या या प्रसंगामुळे लग्नात आलेले लोकही अचंबित झालेले दिसतात.








