
ईदच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय पलक तिवारी, शहनाज गिल, राघव जुयाल, भूमिका चावला आणि पूजा हेगडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला समीक्षकांनीही संमिश्र प्रतिसाद दिला आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ५७००हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. सलमानच्या या चित्रपटासाठी ईद हा सण मोठा फॅक्टर मानला जात आहे.







