
Viral News : ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने मत्सरातून तिच्या पतीचे लिंग वस्तऱ्याने कापून टाकले. लिंग कापल्यावर तिने ते टॉयलेटमध्ये फेकून दिले. या घटनेनंतर पत्नी थेट पोलिस ठाण्यात जाऊन तिने केलेल्या गुन्हाची तिने कबुली दिली. हे प्रकरण कोर्टात गेल्यावर न्यायालयाने पत्नीला ५ वर्षांची शिक्षा दिली. मात्र, महिलेच्या पिडीत पतीने पत्नीला माफ केले असून तो पुन्हा तिच्यासोबत राहण्यास तयार झाला आहे. पत्नीच्या या कृत्यासाठी त्याने स्वत:लाच जबाबदार धरले आहे.







