
Japan Viral news : भारतात भात हे जेवणतील प्रमुख पदार्थ आहे. अनेकांचे जेवण भाताशिवाय पूर्ण होत नाही. या भाताच्या वेगवेगळ्या पदार्थांची माहिती तुम्हाला असेलच. तसेच भात तयार करण्याच्या पद्धती देखील वेगळ्या वेगळ्या आहेत. आज भाताच्या अनोख्या डिशबद्दल तुम्हाला आम्ही माहिती सांगणार आहोत, ज्या बद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसेल. तांदळापासून तयार करण्यात येणारी ही खास डिश जपानमध्ये प्रसिद्ध आहे. ही डिश मुलींच्या बगलेच्या घामापासून बनवली जाते. होय, तुम्ही जे वाचत आहात ते बरोबर आहे. कदाचित तुम्हाला हे वाचून किळसवाणे वाटेल पण, जपानमध्ये मुलींच्या बगलेच्या घामाने बनवलेली डिश ही चवीने खाल्ली जाते. या डिशची मोठी मागणी असून या साठी रांगा लावण्यासाठी देखील नागरिक तयार असतात.








