
६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथ जन्मलेल्या विनोद खन्ना यांची ओळख करून द्यायची काहीच गरज नाही. आपल्या कारकिर्दीत एकाहून एक सरस आणि उत्तम असे चित्रपट देणाऱ्या विनोद खन्नासाठी भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक विशेष जागा आहे. तब्बल १५० चित्रपटात काम करणारे विनोद खन्ना यांनी त्यावेळी बॉलिवूडच्या अँग्री यंग मॅन म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या तोडीस तोड भूमिका साकारल्या होत्या. हेरा फेरी, अमर अकबर अॅंथनी, मुकद्दर का सिकंदर या चित्रपटात तर विनोद खन्ना यांनी बच्चनलासुद्धा खाऊन टाकलं होतं.







