
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसऱ्यांदा मोठा धक्का बसला असून महिला कुस्तीपटू विनेश फोगाटची पदक मिळवण्याची शेवटची आशाही मावळली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५० किलोग्रॅम वजनी गटात खेळण्यास अपात्र ठरल्यानंतर विनेशने रौप्य पदक बहाल करण्याबाबत इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये (CAS) याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी झाली आहे, पण निकाल देण्याची तारीख सतत पुढे ढकलली जात होती. अखेर लवादाचा अंतिम निर्णय आला आहे. सीएएसने विनेशची याचिका अपील फेटाळले आहे. यासह तिचं ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगलं आहे.