फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग १२ मध्ये विकास काकडे यांची उमेदवारी दाखल – नागरिकांमध्ये उत्साहाची लाट

0
109
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग १२ मध्ये विकास काकडे यांची उमेदवारी दाखल – नागरिकांमध्ये उत्साहाची लाट

फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे राजकीय वातावरण तापत असताना प्रभाग क्रमांक १२ (अनुसूचित जाती राखीव) या महत्वाच्या प्रभागातून विकास वसंतराव काकडे यांनी राजे गटाकडून शिवसेना (धनुष्यबाण) चिन्हावर अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर प्रभागातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अर्ज दाखल करण्याच्या वेळी प्रभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.

आपल्या उमेदवारीविषयी बोलताना विकास काकडे म्हणाले,
“सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या कार्यातून मी प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहे. प्रभागातील विकासाच्या दिशा ठरवण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करणार आहे.”

त्यांच्या कार्याचा, सामाजिक बांधिलकीचा आणि तळागाळातील जनसंपर्काचा उल्लेख आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वासमोरही नेहमीच होत आला आहे.

साहस क्रीडा मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले विकास काकडे हे सामाजिक, सांस्कृतिक व युवकांच्या उपक्रमांमध्ये सतत अग्रेसर असतात. त्यांच्या आयोजन कौशल्यामुळे तसेच लोकसंपर्कामुळे त्यांना युवकांमध्ये विशेष लोकप्रियता लाभली आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या या जनसमर्थनामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता आणि चर्चा अधिकच वाढली आहे. राजे गटाने त्यांना उमेदवारी दिल्याने सक्षम नेतृत्व मिळणार असून प्रभागात विजयाची मजबूत शक्यता असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.

प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला उत्साह पाहता प्रभाग क्रमांक १२ मधील निवडणूक यंदा अधिक रंगतदार आणि चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे. आता या उमेदवारीनंतर प्रभागातील राजकीय घडामोडींना वेग येणार असून सर्वांचे लक्ष आगामी प्रचार योजनांकडे लागले आहे.