राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्षपदी विकी काकडे

0
20
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्षपदी विकी काकडे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलटण तालुक्याच्या मेळाव्यात सामाजिक न्याय विभाग फलटण शहराध्यक्षपदी सिद्धार्थ काकडे यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट ) जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर नेतृत्वाखाली फलटण तालुक्याचे आमदार दिपक चव्हाण सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष हरिश काकडे यांचा उपस्थितीत फलटण येथील अनंत मंगल कार्यालयातील जाहिर मेळाव्यात सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देवून सिद्धार्थ काकडे यांना गौरवण्यात आले .
सामान्य लोकांच्या गरजेला धाऊन जाणारा , समाजातील लोकांच्या न्यायासाठी लढणारा ,कधीही पद व प्रसिद्धी साठी समोर न येता समाजासाठी तळमळीने कार्य करणारा , लोकांच्या न्याय हक्कासाठी मोर्चे , आंदोलन यामध्ये प्रामुख्याने भाग घेणारा, सर्वसमावेशक काम करणारे व्यक्तीमत्व म्हणजे सिद्धार्थ काकडे