
नवरात्रोत्सव सुरू असल्याने आणि दिवाळी जवळ आल्याने अनेक शहरांमध्ये भाज्यांची मागणी वाढली आहे. परंतु आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढले आहे. शेवगा, गाजर, बीट, कांदा, हिरवी आणि मिरचीच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, फ्लॉवर, ढोबळी मिरची, काकडी, मेथी, शेवगा, गाजर, बीट आणि भोपळ्याच्या दराच्या किंमतीत १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळं आता काही दिवसांपूर्वीच स्वस्तात मिळणाऱ्या भाज्या महागल्याने सामान्यांना खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.






