
एकाच बॉयफ्रेंडवरून झालेल्या हाणामारीमुळं अनेकांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. एकाच मुलासाठी इतकी मारामारी कशाला करायची?, असा सवाल काही लोकांनी विचारला आहे. तर अशा मुलींना कॉलेजमधून काढून टाकायला हवं, असंही काहींनी म्हटलं आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणींवर कुठलीही कार्यवाही झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु आता या प्रकरणामुळं महाविद्यालयातील मुली आणि तरुणी यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.







