
वंदे भारत ट्रेनला देशवासियांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, लवकरच स्लीपर वंदे भारत प्रवाशांच्या सेवेत येऊ शकते, अशी चर्चा आहे. स्लीपर वंदे भारतची ट्रायल काही दिवसांमध्ये सुरू होऊ शकते. त्यानंतर ही स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
नवी दिल्ली : वंदे भारत ट्रेनला देशवासियांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, लवकरच स्लीपर वंदे भारत प्रवाशांच्या सेवेत येऊ शकते, अशी चर्चा आहे. स्लीपर वंदे भारतची ट्रायल काही दिवसांमध्ये सुरू होऊ शकते. त्यानंतर ही स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. यातच जोधपूर-दिल्ली-मुंबई या मार्गादरम्यान पहिली स्लीपर वंदे भारत धावणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार, देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन जोधपूर येथून सुरू होईल, असा कयास आहे. जोधपूर ते दिल्ली आणि मुंबई दरम्यान ही ट्रेन धावेल. पहिल्या टप्यात देशाला अशा तीन स्लीपर वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. या ट्रेनला 16 ते 24 डबे असतील. मार्च महिन्यापर्यंत ही ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.










