Vande Bharat Express | ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेन लवकरच धावणार; शताब्दी-राजधानी एक्सप्रेसपेक्षाही असेल वेगवान | Navarashtra (नवराष्ट्र)

0
55
Vande Bharat Express | ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेन लवकरच धावणार; शताब्दी-राजधानी एक्सप्रेसपेक्षाही असेल वेगवान | Navarashtra (नवराष्ट्र)


‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेन लवकरच धावणार; शताब्दी-राजधानी एक्सप्रेसपेक्षाही असेल वेगवान

वंदे भारत एक्सप्रेस देशाच्या अशा निवडक ट्रेनपैकी एक आहे. ज्यामधून प्रवास करण्याची अनेकांना इच्छा असते. ‘वंदे भारत’ एक्सप्रेस स्लीपर व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत रेल्वे प्रशासन आहे.

नवी दिल्ली : वंदे भारत एक्सप्रेस देशाच्या अशा निवडक ट्रेनपैकी एक आहे. ज्यामधून प्रवास करण्याची अनेकांना इच्छा असते. ‘वंदे भारत’ एक्सप्रेस स्लीपर व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत रेल्वे प्रशासन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्स्प्रेसच्या तुलनेत अधिक वेगाने चालेल. वंदे भारत स्लीपर कोचचा पहिला प्रोटोटाईप मार्चपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याचे परीक्षण एप्रिलमध्ये केले जाईल आणि ट्रेन 2025 च्या अखेरपर्यंत चालू केली जाईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) येथे तयार केल्या जात असलेल्या ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होईल.






Source link