
सोलापूर : सोलापूर शहरात आज राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल झाली आहे. शहरातील नामवंत, जनसंपर्क असलेले आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले माजी नगरसेवक रवि (बॉस) गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी, तसेच यशपाल सोनकांबळे, यशवंत इंगळे, चंद्रकांत शिंगे, बनसोडे, राजकुमार वाघमारे, अशोक कल्लाप्पा शिंगे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
रवि गायकवाड यांच्या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीस सोलापूर शहरात नवी उर्जा आणि संघटनात्मक बळ प्राप्त झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आगामी स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणात या प्रवेशाचा लक्षणीय परिणाम दिसून येईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.








