Uttarakhand Silkyara Tunnel Rescue Live | मोठी बातमी! रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; काही मिनिटांतच बाहेर येणार ४१ कामगार | Navarashtra (नवराष्ट्र)

0
23
Uttarakhand Silkyara Tunnel Rescue Live | मोठी बातमी! रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; काही मिनिटांतच बाहेर येणार ४१ कामगार | Navarashtra (नवराष्ट्र)


मोठी बातमी! रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; काही मिनिटांतच बाहेर येणार ४१ कामगार

सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठीचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले आहे. बोगद्याच्या आत एक रुग्णवाहिका पाठवण्यात आली आहे. कामगारांना लवकरच बाहेर काढण्यात येईल.

सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठीचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले आहे. बोगद्याच्या आत एक रुग्णवाहिका पाठवण्यात आली आहे. कामगारांना लवकरच बाहेर काढण्यात येईल.उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील उत्तरकाशीमधील (Uttarkashi) सिलक्यारा येथील निर्माणाधीन बोगद्यात मागील 17 दिवसांपासून सुरू असलेली बचाव मोहिमेला (Uttarkashi Tunnel Rescue Operation) यश मिळाले आहे. या बोगद्यातून 41 मजूरांना बाहेर काढण्यात येत आहे. या मजुरांच्या सुटकेसाठी विविध यंत्रणा, लष्कराचे जवान प्रयत्न करत होते. मोठ्या मशिन्सही मागवण्यात आल्या होत्या. अखेर 17 दिवसांनी या बचाव मोहिमेला यश मिळाले आहे.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफचा टीमला मोठे यश मिळाले आहे. येत्या काही मिनिटांत कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू होईल, असे येथे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात 16 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अखेर ‘रॅट होल मायनिंग’ तंत्राचा वापर करण्यात आला. या नुसार खोदकामही पूर्ण झाले आहे. या तंत्राचा वापर करत एक सैनिक बोगद्यात घुसला असून येथूनच बोगद्यातून ४१ कामगार बाहेर काढण्यात येत आहेत.






Source link