
Uttarakhand News : मूळचा नेपाळ येथील असलेला एक व्यक्ति उत्तराखंड येथील एका गावांतून तब्बल ६४ वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. हा व्यक्ति १७ वर्षांचा असतांना कामाच्या शोधात पिथौरागढ येथे कामाला आला होता. मात्र, हा व्यक्ति अचानक बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करत त्याच्यावर मृत्यूनंतरचे सर्व विधी केले. मात्र, तब्बल ६४ वर्षांनी हा व्यक्ति अचानक घरी परतल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या व्यक्तीचे वय ८१ वर्ष असून त्याला पाहून सर्व अचंभीत झाले आहेत.







