Uttarakashi Tunnel Collapse | बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंत वाट पाहावी लागणार! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
Uttarakashi Tunnel Collapse | बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंत वाट पाहावी लागणार! | Navarashtra (नवराष्ट्र)


बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंत वाट पाहावी लागणार!

उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना (उत्तराखंड टनेल रेस्क्यू ऑपरेशन) बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. मॅन्युअल ड्रिलिंग किंवा वरपासून खालपर्यंत 86 मीटरपर्यंत ड्रिलिंग, या दोन पर्यायांवर आता काम केले जात आहे.

उत्तरकाशी: उत्तराखंडमधील बोगदा दुर्घटनेतील (Uttarakhand Tunnel Collapse) सर्व ४१ कामगार सुखरूप असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आता या प्रकरणी  मोठी अपडेट समोर येत आहे.  बोगद्यात अडकलेल्या  ४१ मजुरांना बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंत (Christmas) प्रतीक्षा करावी लागणार आहे. 800 मि.मी.चा लोखंडी पाईप ड्रिलिंग करून टाकणाऱ्या ऑगर मशीनचे ब्लेड शनिवारी ढिगाऱ्यात अडकले. त्यामुळे मशीनची निकामी झाली आहे, त्यामुळे आता बोगद्यात वरून खोदकाम करून मार्ग तयार केला जात आहे. यामुळे कामगारांना वाचवण्यासाठी 13 दिवस ते काही आठवडे लागू शकतात.

हे सुद्धा वाचा

बचाव कार्याला वेग

बचाव कार्य अधिकारी आता उरलेल्या 10 किंवा 12 मीटरच्या ढिगाऱ्यात मॅन्युअल ड्रिलिंग करणार  किंवा वरपासून 86 मीटर खाली ड्रिलिंग करणार. मात्र,  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे ( सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी म्हटले आहे की या ऑपरेशनला बराच वेळ लागू शकतो. तर, आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनीही “ख्रिसमसपर्यंत” कामगारांना बाहेर काढलं जाऊ शकतं असं म्हण्टलं आहे.






Source link