
पाकिस्तानातील प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांनी आपल्या गझलांनी जगभरात वाहवा मिळवली आहे. गुलाम अली यांचे उस्ताद राशिद खान यांच्याशी फार जवळचे संबंध होते. गुलाम अली अनेकदा कामानिमित्ताने कोलकात्यात यायचे, तेव्हा दोघांच्या भेटीगाठी व्हायच्या. राशिद खान यांच्या निधनामुळे गुलाम अली देखील शोकमग्न झाले आहेत. त्यांनी आपल्या या जवळच्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. एका व्हिडीओद्वारे राशिद खान यांना श्रद्धांजली वाहताना उस्ताद गुलाम अली म्हणाले की, ‘आजचा दिवस खूपच दु:खद आहे. भारतीयच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध असलेले शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचे निधन झाले आहे.’







