
उर्फी जावेदने २९ ऑक्टोबरच्या संध्याकाळी इन्स्टाग्रामवर तिचा हॅलोवीन पार्टीचा लूक शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने केशरी आणि लाल रंगाचे धोतर घातले होते. तर, चेहऱ्यावर लाल रंग लावला होता. गळ्यात फुलांची माळ घातली होती आणि कानावर अगरबत्ती लावली होती. अभिनेता राजपाल यादव याने ‘भूल भुलैया’ या चित्रपटात साकारलेला ‘छोटा पंडित’ असाच दिसत होता. या लूकला रिक्रिएट केल्यानंतर अभिनेत्रीला मेलवर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. इतकंच नाही, तर अभिनेत्रीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.








