Uddhav Thackeray : कदाचित त्यांच्या वजनाने बाबरी पडली असेल, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला

0
23
Uddhav Thackeray : कदाचित त्यांच्या वजनाने बाबरी पडली असेल, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला


अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होणार आहे. या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्येत सुरू झाली आहे. आज मोदींकडून अयोध्येत अनेक विकासकामांचे लोकार्पण केले. मात्र राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावरूनही राजकीय वादंग निर्माण झाले आहे. राम मंदिराच्या निमंत्रणाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्हाला अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही. मात्र आम्ही कधीही जाऊन दर्शन घेऊ शकतो. यापूर्वी मुख्यमंत्री असताना मी अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे, त्यामुळे आयोध्येत जाऊन कधीही दर्शन घेईन.



Source link