
स्वराज हा मुलगा नसून, ती मुलगी आहे, हे सत्य आता मोनिकाने सगळ्यांना सांगितले. तिने केवळ सांगितलेच नाही, तर स्वराचे खरे रूप देखील सगळ्यांसमोर आणले. आता पुन्हा एकदा मोनिका स्वराला धमकावणार आहे. मोनिका स्वराला घाबरवण्यासाठी म्हणणार आहे की, ‘मी आता केवळ तुझं मुलगी असल्याचं सत्य समोर आणलं आहे. आता तुझ्याबाद्ल आणखी काही वेगवेगळी गुपितं सगळ्यांसमोर आणली तर तुझं काय होईल, याचा आता तू विचार कर…’ आता मोनिकाच्या या धमकीमुळे स्वरा देखील बिथरणार आहे.






