
एरव्ही सर्वांवर आपली हुकुमत गाजवणाऱ्या मोनिकाला मंजुळा आपल्या हटके स्टाईलने उत्तर देताना दिसेल. या भूमिकेसाठी मंजुळाने नवं रुपही धारण केलं आहे. साडी, ठसठशीत कुंकू आणि लक्ष वेधणारे दागिने असा काहीसा मंजुळाचा अंदाज यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर मंजुळा हे पात्र साकारत आहे. या भूमिकेसाठी ती बरीच मेहनत घेताना दिसतेय. एरव्ही उर्मिलाला आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या भूमिकेसाठी बोलीभाषेपासून पोषाखापर्यंत सर्वच बाबतीत तिचं नवं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मंजुळाच्या येण्याने मालिकेत आता कोणतं नवं नाट्य घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. त्यासाठी पाहायला विसरु नका तुझेच मी गीत गात आहे रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.








