Tunisha Sharma Video: तुनिषाच्या आठवणींत भावूक झाला शिजान खान; थ्रोबॅक व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

0
17
Tunisha Sharma Video: तुनिषाच्या आठवणींत भावूक झाला शिजान खान; थ्रोबॅक व्हिडीओ शेअर करत म्हणाला…


अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर तिची आई वनिता शर्मा यांनी शिजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तर, शिजानमुळेच तुनिषाने आत्महत्या केली, असे त्यांनी म्हटले होते. शिजान खान हा तुनिषासोबत ‘अलिबाबा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होता. या मालिकेच्या शूटिंग दरम्यान दोघांचे प्रेमसंबंध जुळल्याचे म्हटले जात होते. तर, शिजानसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर आलेल्या नैराश्यातून तुनिषाने टोकाचे पाऊल उचलले, असे म्हटले गेले. या प्रकरणात पोलिसांनी शिजान खान याला अटक देखील केली होती. मात्र, अभिनेता सध्या जामिनावर बाहेर आला आहे.



Source link