
मात्र, त्याचवेळी शिल्पीच्या डोक्यात एक दुष्ट विचार येतो आणि ती मयुरीला अश्विनी विरोधात भडकावण्यास सुरुवात करते. तुझ्या आईने मुद्दाम बिघडलेली खुर्ची तुला दिली आहे, असे ती मयुरीला सांगायचा प्रयत्न करते. तर, स्वतः कर्ज काढून घेतलेली खुर्ची ती तुला का देईल? तुझा बिझनेस चालवा, असे तिला वाटतच नाहीये. त्यामुळे मुद्दाम तिने तुला ही खुर्ची दिली आहे, असं शिल्पी मयुरीला सांगते. आधी आईच्या बाजूने असलेली मयुरी आत्याच्या या कुटील डावात अडकते आणि आपल्यामुळेच सगळं झालं आहे, यावर विश्वास ठेवते. आता पुन्हा एका मयुरी आणि अश्विनीमधील युद्ध पाहायला मिळणार आहे.








