Tu Chal Pudha: ‘तू चाल पुढं’मध्ये पार पडणार मिसेस इंडिया २०२३, अश्विनीचा नवा लूक येणार समोर

0
23
Tu Chal Pudha: ‘तू चाल पुढं’मध्ये पार पडणार मिसेस इंडिया २०२३, अश्विनीचा नवा लूक येणार समोर


प्रेक्षकांना आपलीशी वाटणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस प्रवास सुरु झाला आणि मालिकेतील अश्विनीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी उचलून धरलं. या स्पर्धेदरम्यान तिला अनेक अडथळ्यांमधून जावं लागलं. पण अखेरीस अश्विनीने या स्पर्धेत पुन्हा कमबॅक केलं. अश्विनीची हि भूमिका सर्वसमावेशक आहे. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभाव, तिचं घराप्रती कर्तव्य ह्या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेणाऱ्या अश्विनीचा मिसेस इंडिया २०२३ ग्रॅन्ड फिनालेचा प्रवास सुरु झालाय. आता अश्विनीला गरज आहे तुमच्या आशिर्वादाची, कारण ही स्पर्धा सोपी नाही आणि शिल्पी तिच्या ह्या प्रवासात अडथळे आणणार हे नक्की.



Source link