
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वसई यार्डात संध्याकाळी ५.१७ वाजेच्या सुमारास एका मालगाडीचं कपलिंग अचानक तुटलं. त्यामुळं धावत्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून खाली घसरले. या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. मात्र सहाव्या आणि सातव्या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. दिवा-वसई मेमूच्या दोन फेर्या काही वेळासाठी स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दिव्याहून या लोकल पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मेमू गाड्यांसाठी वसई स्थानकात थांबलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं.






